शिवराय मनामनात, शिवजयंती घराघरात’ हा गेल्या काही वर्षांपासून रुजलेला नारा यंदा कटाक्षाने पाळण्याची गरज आहे. करोनाचे वाढते संक्रमण पाहता शिवभक्तांनी आपापल्या घरात जयंती साजरी करावी. तसेच शहरात होणाऱ्या विविध सार्वजनिक उपक्रमांना हजेरी लावताना सुरक्षित वावर जोपासण्याची काळजी घेण्याचे आवाहन शिवजयंती चित्ररथ महामंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे संपूर्ण देशावर महामारीचे संकट ओढवलेले आहे. तसेच राज्य सरकारने जारी केलेल्या लॉकडाऊनमुळे 13 मे रोजी बेळगावची ऐतिहासिक शिवजयंती घरातच साजरी करावी. नियमांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन शिवजयंती चित्ररथ महामंडळाचे अध्यक्ष सुनील जाधव यांनी केले आहे.
संपूर्ण सीमाभागात शिवजयंती उत्सव परंपरेनुसार वैशाख शुद्ध द्वितीयेला मोठ्या प्रमाणात व चैतन्यमय वातावरणात दरवर्षी साजरी केली जाते. यंदा हा दिवस 13 मे रोजी शिवजयंती आहे. या शिवजयंती निमित्त दरवर्षी चित्ररथाची मिरवणूक काढली जाते.ही मिरवणूक पाहण्यासाठी बेळगाव व परिसरातील तसेच जवळच्य गोवा व महाराष्ट्र राज्यातील शिवभक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी करतात मात्र या वर्षीच्या कोरोनामुळे सर्व कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
यंदाची शिवजयंती शिवभक्तांनी घरीच शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शिवजयंती साजरी करावी सीमाभागातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला असताना सोशल डिस्टसिंग पाळणे आवश्यक असून गर्दी टाळणं गरजेचे आहे. सर्वच महापुरुषांची जयंती घरातच साधेपणाने साजरी झाली असून शिवभक्तांनी संयम बाळगावा.
शिवजयंती चित्ररथ महामंडळाचे सरचिटणीस जे.बी.शाहपूरकर
यंदा करोनामुळे शिवजयंतीच्या जल्लोषावर बंधने आली आहेत. सरकारनेही यासंदर्भात नियमावली अजून जाहीर केली नसली तरी दरवर्षीप्रमाणे शिवरायांच्या देखाव्याची परंपरा खंडित होणार आहे.लॉकडाऊन मध्येच जयंती उत्सव आल्याने गर्दी टाळण्यासाठी उत्सव घरीच साजरा करण्याचा निर्णय प्रत्येक शिवजयंती मंडळाने घ्यावा.असे आवाहन महामंडळाचे उपाध्यक्ष रवी निर्मळकर यांनी केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवजयंती साधेपणाने गल्लीत साजरी करण्याचे आवाहन शिवजयंती चित्ररथ महामंडळाचे प्रवक्ते रवींद्र जाधव यांनी केले आहे. त्यामुळे यंदा जल्लोष करता येणार नसला तरी कोरोना नियमावलीचे काटेकोर पालन करून कोरोनाच्या रुग्णांना शिवजयंती मंडळाच्या उपक्रमांच्या माध्यमातून मदत करून यावेळेची शिवजयंती साजरी करावी
कोरोनाच्या संकटामुळे आपल्या सर्वांना सर्वच सण-उत्सव अगदी साधेपणाने व कोरोना बाबतच्या नियमांचे पालन करून साजरे करावे लागले. तसेच अद्यापही कोरोनाचे संकट पूर्णपणे दूर झालेलं नाही. त्यामुळे पुढील काही काळ आगामी सण- उत्सव देखील साधेपणाने लागणार आहे. त्याच धर्तीवर यंदाची शिवजयंती सुद्धा साधेपणाने साजरी करा असे आवाहन चित्ररथ महामंडळाचे उपाध्यक्ष मेघन लगरकांडे यांनी केले आहे.