Monday, December 23, 2024

/

सलग तिसऱ्या दिवशी पंधराशेहुन अधिक कोरोना रुग्ण

 belgaum

बेळगाव जिल्ह्यात रविवारी  कोरोना रुग्णांने उच्चांक गाठला आहे गेल्या 24 तासांत 1762नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत.16 मे रोजी पर्यंत बेळगाव जिल्ह्यातील सक्रिय रुग्ण संख्या 12122 वर पोचली आहे.

रविवारी 100रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत एकीकडे गेले तीन दिवस 1500 हुन अधिक रुग्ण सापडत असताना डिस्चार्ज झालेल्यांची संख्या मात्र कमी आहे रविवारी केवळ 100 रुग्ण डिस्चार्ज झाले आहेत.

जिल्हा मेडिकल बुलेटिन मध्ये रविवारी कोरोनामुळे 4 मयत झाले असून एकूण मयत संख्या 393 झाली आहे.

गेले तीन दिवस सापडलेले रुग्ण

1792 रुग्ण on 16-5-2021

1592 रुग्ण on 14-05-2021

1502 रुग्ण on 15-5-2021

अथणीत वाढले कोविड रुग्ण
रविवारी अथणी तालुक्यात 386 तर 370 बेळगाव तालुक्यातील कोविड रुग्ण सापडले आहेत.रविवारी सापडलेले 1762 हे आता पर्यंतचे बेळगाव जिल्ह्यात एका दिवसातले सर्वाधिक रुग्ण आहेत गोकाक 305 तर रायबाग 125,चिकोडी 150 तर हूक्केरी 120  रुग्ण सापडले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.