दिवसेंदिवस वाढत असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने हलगा येथील सुवर्ण विधान सौधला कोविड केअर केंद्रात रूपांतर करावे अशी मागणी काँग्रेस आमदार अंजलीताई निंबाळकर यांनी केली आहे.
मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा याना पत्र लिहून त्यांनी ही मागणी केली आहे.सुवर्ण सौध ही इमारत राज्य सरकारने 400 कोटी रुपये खर्चून उभी केली आहे ती रिकामीच आहे.
गेल्या दोन वर्षापासून या सुवर्ण सौधमध्ये अधिवेशन घेण्यात आलेले नाही एकाच वेळी हजारो रुग्णांवर उपचार होऊ शकतात त्यामुळे सुवर्ण सौध मध्ये कोविड केअर सेंटर सुरू करावे अशी मागणी त्यांनी पत्रात केली आहे.
सोशल मीडियावर युवा समितीच्या माध्यमातून युवकांनी देखील सुवर्ण सौध मध्ये कोविड विलगीकरणं केंद्र उघडा जेणे करून एकाच वेळी 5 हजार रुग्णावर उपचार होतील अशी मागणी केली होती त्याचीच री ओढत अंजली निंबाळकर यांनी मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांना पत्र लिहून वरील मागणी केली आहे.
Sir @CMofKarnataka if the worst is yet to come please atleast now start preparing.
Listen to the Scientific Community.
Cases have increased in BELGAVI.
Consider CCC at Vidhan Soudha BELGAVI ??. @RahulGandhi @rssurjewala @kcvenugopalmp @IYCKarnataka @KPCCKarnataka @siddaramaiah pic.twitter.com/rUjBzIfIfh— Dr. Anjali Nimbalkar (@DrAnjaliTai) May 6, 2021