Wednesday, November 27, 2024

/

उद्यापासून 10 पटीने अधिक कडक निर्बंध : पोलीस उपायुक्त डाॅ. आमटे

 belgaum

उद्यापासून लागू होणाऱ्या लॉकडाउनच्या मार्गदर्शक सूचीचे नागरिकांनी काटेकोर पालन करावे सध्याच्या 10 पटीने अधिक कडक निर्बंध उद्यापासून लादले जाणार असून विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी दिला आहे.

वाढत्या कोरोना प्रादुर्भाव आला थोपविण्यासाठी राज्यभरात उद्या सोमवारी 10 मे पासून ते 24 मे पर्यंत लॉकडाउन जारी करण्यात आला आहे. बेळगाव लाईव्हच्या प्रतिनिधींने शहरात उद्यापासूनचा लॉकडाउन कसा असणार हे पोलीस उपायुक्त डॉ विक्रम आमटे यांच्याकडून जाणून घेतले. त्यावेळी डॉ आमटे यांनी उपरोक्त इशारा दिला. ते म्हणाले की, लॉक डाऊन संदर्भातील मार्गदर्शक सूचीचे सर्वांना काटेकोर पालन करावे लागेल.

यामध्ये पोलिस खात्याकडून प्रामुख्याने वाहन तपासणीसह सर्व सीमा सील बंद केल्या जातील. कोठेही कोणत्याही प्रकारची गुंतागुंत अथवा बिघाड होऊ दिला जाणार नाही. लॉकडाउनच्या कालावधीत रस्त्यावर कोणत्याही खाजगी वाहनांची वर्दळ राहणार नाही. लॉकडाउनच्या कालावधीत सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत नागरिक आवश्यक साहित्याच्या खरेदीसाठी घराबाहेर पडू शकतील. मात्र यासाठी त्यांना वाहन न घेता पायी जावे लागेल. थोडक्यात घराच्या आसपासच्या परिसरातच त्यांना आपली खरेदी करावी लागेल. याबाबतीत आम्हाला जनतेचे सहकार्य अपेक्षित आहे असे पोलीस उपायुक्तांनी सांगितले.

हॉस्पिटल -दवाखान्याला जाऊ इच्छिणार्‍यांनी संबंधित कागदपत्रे दाखवणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे विमान अथवा रेल्वे प्रवासास जाणार्‍यांना प्रवासाचे तिकीट दाखवावे लागेल. संबंधित प्रवासी ऑटोरिक्षा किंवा टॅक्सीने जाऊ शकतात. मात्र सर्व ऑटोरिक्षा चालकांना पोलीस खात्यातर्फे माझी विनंती आहे की उद्यापासून 24 मे पर्यंत त्यांनी आपल्या ऑटोरिक्षा ऑटो स्टैंडवर थांबवू नयेत. जर कोणी फोन करून बोलावून घेतले तर व्हाट्सअपवर संबंधितांच्या तिकिटाचा फोटो अथवा वैद्यकीय कागदपत्राचा फोटो मागून घेऊन तो दाखवून त्या प्रवाशाला आणण्यास जावे. प्रवाशांना इच्छित स्थळी पोहोचवून परतताना देखील ऑटो किंवा टॅक्सी चालकाला तसा पुरावा द्यावा लागेल, असेही डॉ. आमटे यांनी स्पष्ट केले.

लॉकडाऊन कालावधीत विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या यांची गय केली जाणार नाही असे सांगून शहरातील समस्त पोलीस कर्मचारी उद्यापासून रस्त्यावर उतरणार आहेत असे त्यांनी सांगितले. शहरांमधील प्रत्येक रस्त्यावर पोलिस असतील सर्व बॉर्डर सील बंद केल्या जातील. सध्या जे निर्बंध आहे त्याच्या दहा पटीने अधिक कडक निर्बंध उद्यापासून असणार आहेत. आपत्कालीन सेवा देणारी वाहने, प्रवाशांना घेऊन जाणारी वाहने आणि सरकारी अधिकाऱ्यांची वाहने वगळता अन्य कोणत्याही वाहनांना रस्त्यावर फिरण्यास सक्त मनाई असणार आहे. सरकारी अधिकाऱ्यांना सरकारी वाहनाचाच वापर करता येईल. ज्यांच्याकडे सरकारी गाडी नाही त्यांना आपले ओळखपत्र दाखवावे लागेल, असे पोलीस उपायुक्त डॉ विक्रम आमटे म्हणाले.AAmte checking vehicles

नव्या मार्गदर्शक सूचीनुसार लग्न समारंभ घरामध्येच ते देखील फक्त 40 लोकांच्या उपस्थितीत पार पाडता येतील. लग्नास जाणाऱ्या नागरिकांकडे तहसीलदार किंवा संबंधित अधिकाऱ्यांचे परवानगी पत्र असले पाहिजे अन्यथा त्यांना अडवून कठोर क्रम घेतले जातील. पोलीस खात्याकडून कोणताही पास वगैरे दिला जाणार नाही.

एखादी व्यक्ती निधन पावलेली असल्यास अंत्यविधी संदर्भातील मार्गदर्शक सूचीचे पालन केले जावे अंत्यविधीसाठी पाच पेक्षा अधिक लोकांना परवानगी दिली जाणार नाही असेही डॉ आमटे यांनी स्पष्ट केले. शहरातील बॅरिकेडच्या अडथळा संदर्भात बोलताना ऍम्ब्युलन्स तसेच खाजगी वाहनातून हॉस्पिटलला जाणाऱ्यांसाठी किंवा लसीकरणात जाणाऱ्यांसाठी बॅरिकेड्स हटविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली. त्याचप्रमाणे नागरिकांना लॉक डाऊनच्या कालावधी काही समाजोपयोगी सूचना करावयाच्या असतील तर त्यांनी पोलीस कंट्रोल रूमशी संपर्क साधावा, असे आवाहन देखील पोलीस उपायुक्त डॉ विक्रम आमटे यांनी केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.