राज्यामध्ये कोरोना प्रादुर्भावाचा झालेला कहर आणि त्या अनुषंगाने पालक आणि शैक्षणिक संस्थांनी व्यक्त केलेली चिंता लक्षात घेऊन
येत्या 21 जूनपासून सुरू होणारी एसएसएलसी परीक्षा पुढे ढकलण्यात आली असल्याचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण खात्याचे मंत्री एस. सुरेशकुमार यांनी जाहीर केले आहे.
कोरोना प्रादुर्भावाची दुसरी लाट ओसरल्यानंतर परिस्थिती पाहून सदर परीक्षेसंदर्भात योग्य निर्णय घेतला जाईल असे शिक्षण मंत्र्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.
त्याचप्रमाणे परीक्षेची नवी तारीख विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वेळ मिळावा यासाठी परीक्षेच्या खूप आधी जाहीर केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.