राज्य शासनाच्या क्रीडा शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत क्रीडा विभागाने प्राथमिक व माध्यमिक शाळातील (सहावी ते दहावी) प्रतिभावंत अथलेट्सना प्रोत्साहन देण्यासाठी 10 हजार रुपयांची शिष्यवृत्ती जाहीर केली असून अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.
अर्जदार 2020 -21 शैक्षणिक वर्षातील विद्यार्थी असावा. त्याने राज्य क्रीडा प्राधिकरणाने 1/4/2020 ते 31/3/2021 पर्यंत घेतलेल्या राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये भाग घेऊन किंवा अधिकृत क्रीडा संघटनांनी घेतलेल्या राष्ट्रीय पातळीवरील खेळांमध्ये भाग घेऊन प्रथम स्थान मिळविलेले असावे. राष्ट्रीय खेलो इंडिया खेळात राज्य संघाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडूही अर्ज करू शकतात. शिक्षण खाते स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेतला असेल किंवा राष्ट्रीय स्पर्धेत राज्य संघाचे प्रतिनिधित्व केले असेल तर असे खेळाडू देखील अर्ज करू शकतात.
एखाद्या खेळाडूने एका पेक्षा जास्त खेळांमध्ये भाग घेतला असला तरीही तो वार्षिक शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरू शकतो. पात्र खेळाडूंनी http:// serviceonline.gov.in/karnataka या संकेत स्थळाला भेट देऊन 25 मे पूर्वी ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.