कोविड काळामध्ये खाजगी इस्पितळाकडून गरीब रुग्णांची होणारी आर्थिक लुबाडणूक थांबवण्यासाठी राज्य सरकारने सिटीस्कॅन 1500 रुपये आणि एक्सरे 250रू काढण्यासाठी दर निश्चित केले होते.
त्या दरामध्ये पुन्हा बदल करण्यात आला आहे.
राज्य सरकारने बजावलेल्या नवीन आदेशानुसार खाजगी इस्पितळानी 1500 रूपये बी पी एल कार्डधारकांसाठी सिटीस्कॅन आणि इतरांना 2500 रूपये दर निश्चित केला आहे. कर्नाटक राज्य सरकारच्या आरोग्य खात्याचे अतिरिक्त आयुक्त जावेद अख्तर यांनी हा आदेश बजावला आहे.
एकिकडे आरोग्य खात्याने दर निश्चित केला असला तरी बेळगाव शहरातील सर्व खासगी इस्पितळे शासनाच्या दराची अंमलबजावणी करताना कुठच दिसत नाही आहेत. शनिवारी सिटीस्कॅन आणि एक्सरे काढून घ्यायला गेलेल्या बहुतेक रूग्णांना खासगी इस्पितळाकडून योग्य प्रतिसाद मिळाला नाही.
शासकीय आदेश केवळ कागदावरच आहे बेळगांवच्या जिल्हाधिकारीनी यात लक्ष घालुन शासनाने निश्चित करूण दिलेले दर न घेतलेल्या इस्पितळांवर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.