10 ते 24 मे पर्यंतच्या लॉकडाऊन मध्ये दररोज सर्व गरजू वस्तू मिळणार आहेत त्यांची दुकाने देखील सुरू राहणार आहेत मात्र बेळगावच्या जनतेने शनिवारी शहराच्या मार्केट मध्ये खरेदीसाठी तोबा गर्दी केली होती.
भेंडी बाजार असो गणपत गल्ली नरगुंदकर भावे चौक असोत किंवा चावी मार्केट कांदा मार्केट पांगुळ गल्ली असो खरेदीसाठी अक्षरशः झुंबड उडाली होती कोणत्याही प्रकारचा सोशल डिस्टन्स पाळला जात नव्हता त्यामुळे कोरोना कमी होण्या ऐवजी वाढण्याची शक्यता अधिक आहे.
बेळगावकर जनतेने संयम दाखवण्याची गरज असताना शनिवारी सकाळी खरेदीसाठी गर्दी करून कोरोना नियम पायदळी तुडवले आहेत.
शासनाने सोमवारी 10 पासून जाहीर केलेल्या लॉक डाऊन मध्ये किराणा भाजी पाला आणि मांस व अत्यावश्यक वस्तूंची दुकाने सुरू रहाणार जाहीर केले असताना देखील एवढी गर्दी करणे म्हणजे कोरोनाला आमंत्रण देण्यासारखे आहे.बेळगावकर कधी सुधारणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
संयुक्त महाराष्ट्र चौक असो किंवा खडे बाजार मधील मोठे कापड व्यावसायिक तरी बिनधास्तपणे आपली दुकाने सुरू करत आहेत राजकीय ताकतीचा वापर करून आपले दुकाने सुरू करणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई करावी अशी देखील मागणी वाढत आहे.कायदा नियम सर्वांना एक सारखा असायला हवा सत्तेतील राजकीय पक्षाशी संबंधितांचे कापड दुकाने सुरू आहेत ती बंद करा अशी मागणी होत आहे.
शनिवारी सकाळी खरेदीसाठी झाली तोबा गर्दी
भेंडी बाजार असो गणपत गल्ली नरगुंदकर भावे चौक असोत किंवा चावी मार्केट कांदा मार्केट पांगुळ गल्ली असो खरेदीसाठी अक्षरशः झुंबड उडाली होती त्याची दृश्ये
https://www.instagram.com/p/COmYscJBK7K/?igshid=mmt568gk4xos