कोरोनाच्या महामारीमुळे उद्योग बंद पडले आहेत, लोकांचा रोजगार बंद झाला आहे. या पार्श्वभूमीवर सामान्य माणसाचं जगणं अवघड झाले आहे. नित्याच्या गरजेच्या वस्तूही घेणं त्यांना अशक्य झालं आहे.अशा वेळी गरजवंतांना शोधून त्यांच्यापर्यंत जीवनावश्यक वस्तू पोचवण्याचं काम मराठा समाज करत आहे.
आपली सामाजिक जबाबदारी ओळखून मराठा समाज नेहमीच जनतेसोबत राहिला आहे, या पार्श्वभूमीवर मराठा समाजाने केलेले कार्य लोकपयोगी ठरत आहे.पहिल्या टप्प्यात 78 गरजूंना किट देण्यात आले.
या उपक्रमा बरोबरच लवकरच मराठा समाजातर्फे लहान मुलाचे कोविड केंद्र चालू केले जाणार आहे, त्यासाठीची तयारी चालू आहे. सामाजिक बांधिलकी जपत अनेक उपक्रम मराठा समाजातर्फे राबविले जात आहेत.त्यासाठी मराठा समाजातील बांधवांनी पुढे यावे असे आवाहन मराठा समाजातर्फे करण्यात येत आहे.
जीवनावश्यक वस्तू वाटपाच्या योजनेसाठी किरण जाधव, यल्लोजीराव पाटील, रवी कोकितकर, सुनील जाधव, गुणवंत पाटील,ज्योतिबा दौलतकर,राजन जाधव, जे. बी. शहापूरकर, परशराम निलजकर, राजू तंगणकर, रवी निर्मळकर यांनी विशेष परिश्रम केले.