कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सर्व निवडणुका 6 महिने लांबणीवर टाकण्यात आल्याचे राज्य सरकारने जाहीर करून दोन दिवस उलटले नाहीत तोवर बेळगाव जिल्हा पंचायतीसह तालुका पंचायतींचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.
सदर आरक्षणानुसार बेळगाव जिल्हा पंचायतीमधील एकूण 101 जागांपैकी 51 जागा महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जातीच्या 12 जागांपैकी 6, अनुसूचित जमातीच्या 7 पैकी 4, मागास वर्ग ‘अ’ च्या 25 पैकी 13, मागास वर्ग ‘ब’ च्या 6 पैकी 3, खुल्या 51 जागांपैकी 25 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.
बेळगाव तालुका पंचायत आरक्षण : बेळगाव तालुका पंचायतीतील 43 पैकी 17 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. अनुसूचित जातीच्या 2 जागांपैकी 1, अनुसूचित जमातीच्या 4 पैकी 2, मागास वर्ग ‘अ’ च्या 9 पैकी 5, मागासवर्ग ‘ब’ च्या 2 पैकी 1, खुल्या 17 जागांपैकी 8 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
खानापूर तालुका पंचायतीमधील 20 पैकी 10 जागा महिलांसाठी राखीव ठेवल्या आहेत. अनुसूचित जातीच्या 2 पैकी 1, अनुसूचित जमातीत 1, मागासवर्ग ‘अ’ च्या 6 पैकी 3, मागास वर्ग ‘ब’ ची 1, खुल्या 10 जागांपैकी 4 जागा महिलांसाठी राखीव असतील.
निपाणी तालुका पंचायतीतील 16 पैकी 8 जागा महिलांसाठी राखीव असतील. अनुसूचित जातीच्या 3 जागांपैकी 2, अनुसूचित जमातीची 1 जागा महिलांसाठी, मागासवर्ग ‘अ’ च्या 3 पैकी 2, खुल्या 8 जागांपैकी 3 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
चिकोडी तालुका पंचायतीतील 21 पैकी 11 जागा महिलांसाठी राखीव असतील. अनुसूचित जातीच्या 3 जागांपैकी 2, अनुसूचित जमातीतील 1, मागास वर्ग ‘अ’ च्या 5 पैकी 2, मागास वर्ग ‘ब’ 1, खुल्या 11 जागांपैकी 5 जागा महिलांसाठी राखीव असतील.