लॉक डाऊन कालावधीत देखील सकाळी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी लोक तोबा गर्दी करत आहेत.वाहने घेऊन खरेदीला येत असल्याने वाहतुकीची कोंडी अनेक ठिकाणी होत आहे.त्यामुळे अनेक ठिकाणी पोलिसांनी बॅरिकेड्स लावून रस्ते बंद केलेत.
शिवाय वाहतूक पोलिसही तैनात केलेत.विना मास्क ,विना हेल्मेट ,विना नंबर प्लेट वाहनावर कारवाई केली जात आहे.शनी मंदिर कडे देखील सोमवारी सकाळी वाहतूक पोलीस कारवाई करत होते.
त्यावेळी एका लोकप्रतिनिधींच्या चेल्याला विना नंबर प्लेट दुचाकी चालवत असल्या बद्दल थांबवले.थांबल्यावर त्या चेल्याने पोलिसांशी वाद घालण्यास सुरुवात केली.पोलीस समजावून सांगत होते पण तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता .पोलिसांनी देखील त्याचे वाद घालणं पाहून त्याला चांगलीच समज दिली.
अखेर चेल्याने कोणाला तरी फोन लावून पोलिसांना दिला.फोनवरील व्यक्तीने वाहन सोडण्यास पोलिसांना सांगितले.त्यावर पोलिसांनी पहीलेंदा ज्या व्यक्तीसाठी फोन केलाय त्याला नीट बोलायला सांगा म्हणून खरडपट्टी काढली.अखेर पोलिसांनी वाहन सोडल्यावर दीनवाणा चेहरा करून तो चेला निघून गेला.