लॉक डाऊन 2 मध्ये सकाळी 6 ते 10 या वेळेत अत्यावश्यक सेवेसाठी वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे.सुरुवातीच्या मार्गदर्शक तत्वात भाजीपाला किंवा किराणा माल आणण्यासाठी चार चाकी किंवा दुचाकी वापरास बंदी घालण्यात आली होती मात्र आता राज्य पोलीस महासंचालक प्रवीण सूद यांनी काढलेल्या नवीन आदेशानुसार सकाळच्या सत्रात भाजीपाला किंवा किराणा माल आणण्यासाठी सकाळच्या सत्रात परवानगी देण्यात आली आहे.
राज्य सरकारने सकाळच्या सत्रात चार चाकी किंवा दुचाकी वापरावर बंदी घातली होतीचार पाच किलो भाजी आणण्यासाठी चालत जावे लागत होते त्यामुळे राज्य सरकारवर टीका झाली होती या निर्णयचा विरोध झाल्याने राज्य शासनाने नवीन आदेश काढत सकाळच्या सत्रात वाहन वापरास परवानगी दिली आहे.
राज्य पोलीस महासंचालक प्रवीण सूद यांनी जवळच्या बाजारपेठेत जाऊन भाजी किंवा किराणा माल आणण्यास परवानगी दिली आहे.मात्र या शिथिल अटीचा गैरफायदा घेतल्यास वाहन जप्ती किंवा कारवाई अटळ आहे असे देखील आदेशात म्हटले आहे त्यामुळे खरोखरचं भाजी पाला किंवा किराणा माल खरेदी असेल तर घरा बाहेर पडणे योग्य ठरणार आहे.
सकाळी 10नंतर जर कुणी दुचाकी घेऊन घराबाहेर पडत असेल तरी देखील कारवाई होणार आहे.सदर नियम फक्त ग्रामीण भागाला शिथिल करण्यात आला आहे शहरी भागासाठी नियम जैसे थें असणार आहे त्यामुळे वरील शिथिलता बेळगाव शहरात लागू पडणार नाही.