बेळगावचे पालकमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री गोविंद कारजोळ यांनी ऑक्सिजन युनिट स्थापन करण्या बाबत राज्य सरकारकडे मोठी मागणी केली आहे.
ओएनजीसी(ऑइल अँड नॅचरल गॅस कार्पोरेशन)मार्फत बेळगाव आणि बागलकोट जिल्ह्यासाठी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभा करावा अशी मागणी कारजोळ यांनी राज्य सरकारला पत्र लिहून केली आहे.कोविड काळात सर्वत्र ऑक्सिजनचा तुटवडा भासत असून ऑक्सिजन उत्पादन घटक निर्माण केल्यास सदर समस्या दूर होईल.
अवजड उद्योग मंत्री जगदीश शेट्टर यांची भेट घेत आमदार चिरंतीमठ यांनी सदर ऑक्सिजन निर्मिती प्लांट बागलकोट ला निर्माण केल्यास आजू बाजूच्या 100 की मी परिसरात ऑक्सिजन पुरवठा केला जाऊ शकतो अशी मागणी केली आहे.
बागलकोटच्या जिल्हाधिकारी यांनी सदर प्रस्ताव राज्य सरकार कडे पाठवला आहे याचा विचार केला जावा अशी मागणी केली आहे.