बेळगाव पोलिसांनी लॉकडाऊन काळात कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी एक हजार हुन अधिक वाहन जप्त केली आहेत.25 एप्रिल ते 6 मे च्या काळात कारवाई केली आहे.
राज्य सरकारने कोविड नियंत्रणासाठी लागू केलेल्या कर्फ्यु काळात काहीही काम नसताना फिरणाऱ्या दुचाकीवर कारवाई करत पोलिसांकडून इतक्या मोठ्या प्रमाणात वाहने जप्त केली आहेत.
सकाळी 12 पर्यंत कामानिमित्त फिरण्याची मुभा देण्यात आली होती मात्र दुपारी नंतर विनाकारण फिरणाऱ्यावर कारवाई करत लॉक डाऊनची अंमलबजावणी काटेकोरपणे केली होती.
अशी ट्रॅफिक कमी होऊ देत म्हणून शहरात अनेक ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत.