सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रुग्णांची परवड होत आहे तिथे ऑक्सिजन बेडस कमी आहेत त्यांची संख्या वाढवून घ्यावी, कोणत्याही परिस्थितीत रुग्णाला परत पाठवून नका असे निर्देश जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ यांनी सिव्हिल प्रशासनाला द्यावेत अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने केली आहे.
सोमवारी दुपारी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली
बेळगावमधील ऑक्सिजन टंचाईबद्दल सविस्तर चर्चा केली.
बेळगावातील अनेक सामाजिक संस्थाच्या मार्फत घरी आयसोलेशनमध्ये असणाऱ्या रुग्णांना ऑक्सिजन पुरवत आहेत त्यांना बंद केलेला ऑक्सिजन लवकरात लवकर सुरू करावा अशीही आग्रही मागणी युवा समितीच्या वतीने करण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी ऑक्सिजन पुरवठा मुबलक प्रमाणात व्हावा यासाठी प्रयत्न करीत आहोत असे सांगितले तसेच जनतेने घाबरून न जाता जिल्हा रुग्णालयात दाखल करावे असे आवाहन केले.
जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला प्रवेश देण्यात येईल कुणालाही परत पाठवले जाणार नाही असे आश्वासन दिले.
यावेळी युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके, शहर समितीचे मदन बामणे, साईनाथ शिरोडकर, अभिजित मजुकर उपस्थित होते.