Thursday, November 28, 2024

/

*बिम्सच्या दहा कर्मचाऱ्यांना नोटीस*

 belgaum

कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी जिल्हा रुग्णालयाचे शल्य चिकित्सक डॉ.खाजी यांनी दहा कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

चोवीस तासात या नोटीसिला उत्तर देण्यात यावे असे या दहा कर्मचाऱ्यांना कळवले आहे. कोरोना वॉर्डातील मृत व्यक्तींचे मृतदेह शवागारात हटवण्या बाबत हलगर्जीपणा दाखवल्या बद्दल नोटिसा देण्यात आल्या आहेत.

उप मुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी रविवारी जिल्हा रुग्णालयाला भेट देवून तेथील अनागोंदी कारभार पाहून अधिकारी वर्गाला धारेवर धरले होते.

तेथील अव्यवस्था पाहून उप मुख्यमंत्री चांगलेच भडकले होते.पाहणी केल्यावर त्यांनी अधिकारी वर्गाची भेट देवून त्यांना सुधारणा करा म्हणून ताकीद दिली होती.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.