कर्नाटकातील लॉक डाऊन वाढविण्याबाबत तांत्रिक समितीने अद्याप शिफारस केलेली नसल्याचे मुख्यमंत्री बी.एस.येडीयुरप्पा यांनी स्पष्ट केले.
बंगलोर येथे आपल्या निवासस्थानी सफाई कामगारांना रेशन किट वितरण केल्यावर प्रसार माध्यमांशी ते बोलत होते.
आगामी दिवसात लॉक डाऊनला जनतेने चांगला प्रतिसाद दिला रुग्ण संख्या कमी झाली तर लॉक डाऊन वाढवण्याची वेळ येणार नाही.
दि.५ किंवा सहा जून रोजी मंत्रिमंडळ आणि अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे.त्या नंतर लॉक डाऊन वाढविण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
सध्या सुरू असलेल्या लॉक डाऊन चा कालावधी दि.७ जून रोजी सकाळी सहा वाजता संपणार आहे.
कर्नाटक सरकारने रुग्ण वाढायला लागल्या वर दि.२३ एप्रिल रोजी चौदा दिवसांचा क्लोज डाऊन जाहीर केला होता.पण १० मे पासून २४ मे पर्यंत संपूर्ण लॉक डाऊन जाहीर केला होता.रुग्ण संख्या वाढू लागल्याने सरकारने पुन्हा लॉक डाऊन ७ जून पर्यंत वाढवला आहे.