केवळ आठच दिवसाच्या आत आई वडील आणि मुलगा या तीन सदस्यांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची हृदय द्रावक घटना बेळगाव शहरात घडली आहे.एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा मृत्यू झााल्यानं हळहळ व्यक्त करण्यात येत आहे
बॉक्साईट रस्त्यावरील विद्यानगर येथील रहिवासी पार्वती कृष्णा तेरगाव वय 76, निवृत्त उपनोंदणी अधिकारी कृष्णा भिमाप्पा तेरगाव वय 80,प्रशांत कृष्णा तेरगाव वय 49 अशी त्यांची नावे आहेत.
पार्वती यांचे 24 एप्रिल रोजी तर कृष्णा यांचे 29 रोजी आणि प्रशांत यांचे सोमवारी 3 मे रोजी निधन झाले आहे.कृष्णा आणि प्रशांत हे दोघे जण सब रजिस्ट्रार कार्यालयात कन्सल्टंट म्हणून कार्यरत होते त्यामुळे बेळगाव शहरात त्यांचा मोठा मित्र परिवार होता.