मराठा मंदिर येथील आयसोलेशन सेंटरचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.गुरुवारी किंवा शुक्रवारी हे कोविड केअर सेन्टर सुरू होणार आहे.
समितीच्या माध्यमातून आयसोलेशन सेंटर सुरू करण्यात येणार असल्याचे समजताच मदतीचा ओघ सुरू झाला असून बांधकाम व्यावसायिक आर एम चौगुले यांनी दहा बेड आणि पंचवीस हजार रुपयेची रोख देणगी दिली.
या शिवाय असून संजीवनी फौंडेशनने दहा बेड आणि दहा हजार रुपये रोख शैनेश्वर एज्युकेशनल ट्रस्ट दहा बेड तसेच रिचल भोसले यांनी दहा बेडची व्यवस्था केली आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या या सामाजिक उपक्रमांसाठी प्रत्येकाने सढळहस्ते मदत करावी असे आवाहन करण्यात आले आहे.