बेळगाव शहरातील पोलीस, डॉक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचारी कोरोनाग्रस्तांचे प्राण वाचवण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालत आहेत.
आपल्या कुटुंबापासून महिनोंमहिने दूर राहून सामान्यांसाठी दिवस-रात्र झटत आहेत. ही वस्तुस्थिती असताना काल रात्री शहापूर येथे समाजकंटकांनी एका हॉस्पिटलवर हल्ला चढवून डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याचा प्रकार अत्यंत निंदनीय आहे, अशी प्रतिक्रिया भाजप नेते किरण जाधव यांनी व्यक्त केली आहे
एकीकडे कोव्हिड योद्ध्यांसाठी टाळ्या वाजविल्या जातात. त्यांच्या कामाचं कौतुक म्हणून फुलांचा वर्षाव केला जातो. मात्र, दुसरीकडे आपल्या समाजातच एक विदारक चित्र पहायला मिळतंय. कर्तव्यासाठी जीवाची पर्वा न करणाऱ्या या कोव्हिड योद्ध्यांवर हल्ले होतायत असे सांगून डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांना मारहाण केली जात असल्याचे जे चित्र शहापूर भागात काल रात्री पहावयास मिळाले. ते अत्यंत निंदनीय असल्याचे मत भाजप नेते किरण जाधव यांनी व्यक्त केले.
शहापूरच्या घटनेबाबत बोलताना किरण जाधव म्हणाले, कोरोनाविरोधात बेळगाव शहरातील संपूर्ण यंत्रणा लढतेय. मात्र, हॉस्पिटल आणि डॉक्टरांना टार्गेट केलं जात आहे. कोव्हिड योद्धे कोरोनाशी लढत असताना. यायो ध्यान वर हल्ला केला जातो हा प्रकार अशोभनीय आहे.
याबाबत लोकांमध्ये प्रबोधन करण्याची गरज आहे. कोरोनाची परिस्थिती अत्यंत आव्हानात्मक आहे. अशा परिस्थितीत लोकांचे प्राण वाचवण्यासाठी डॉक्टर जीवाची पर्वा न करत काम करतात. लोक मात्र डॉक्टरांवर हल्ला करतात ही दुर्दैवाची गोष्ट आहे.
डॉक्टरांवर हल्ल्याच्या घटना देशात वाढतायत. त्यामुळे आम्ही पोलिसांकडे डॉक्टरांना सुरक्षा देण्याची मागणी करणार आहोत. कोव्हिड रुग्णालयांना पोलिसांनी सुरक्षा दिली पाहिजे. डॉ. हलगेकर यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी कर्नाटक मेडिकल सर्व्हिसेस कायद्यांतर्गत कारवाई केली पाहिजे, असेही किरण जाधव यांनी स्पष्ट केले.