लॉक डाउनच्या काळात बांधकाम आणि इतर निर्माण कामगारांच्या मदतीसाठी सरकारकडून या कामगारांना प्रत्येकी 3000 रुपये अदा केले जाणार आहेत, अशी माहिती शहरातील कामगार नेते ॲड. एन. आर. लातूर यांनी दिली आहे.
लॉक डाउनच्या काळात बांधकाम आणि इतर निर्माण कामगारांच्या मदतीसाठी सरकारकडून या कामगारांसाठी प्रत्येकी 3000 रुपयांचे अनुदान जाहीर करण्यात आले आहे.
थोड्याच दिवसात हे अनुदान कामगारांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. त्यासाठी कामगारांना कोणत्याही कागदोपत्री पुराव्याची अथवा शिफारसीची गरज लागणार नाही. कोणालाही पैसे द्यावे लागणार नाहीत.
कारण सदर अनुदानाची रक्कम थेट कामगारांच्या खात्यावर जमा होणार आहे असे सांगून नरेगा कामगारांना मात्र सरकारची ही आर्थिक मदत मिळणार नाही, असे कामगार नेते ॲड. एन. आर. लातूर यांनी स्पष्ट केले आहे.
कामगार खात्याच्या अप्पर मुख्य सचिवांच्या आदेशावरून बांधकाम आणि इतर निर्माण कामगार कल्याण मंडळाच्या सचिवांनी सदर सरकारी अनुदानाची घोषणा केली आहे.