लॉकडाऊनमध्ये जंगले उध्वस्त-सध्या अधिकारी वर्गाचे लक्ष कोरोना चे संकट दूर करण्यासाठी असताना या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच जंगले धोक्यात आली आहेत.
हजारो एकर जंगली भागावर अतिक्रमण करून वृक्षतोड करण्याबरोबरच जंगलात आपला हक्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न काहींनी सुरू केला आहे ,या प्रकारचा रिपोर्ट कर्नाटक वन संरक्षण समितीचे चेअरमन आनंद हेगडे यांनी सरकारला दिला आहे.
चिकमंगळूर शिमोगा तसेच इतर जिल्ह्यांच्या बरोबरीने बेळगाव जिल्ह्यातील वनसंपदा धोक्यात आली असल्याचे या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. अधिकारी वर्गाला कोरोनाच्या पलिकडे इतर कामे नाहीत, वन विभागातील अधिकारीही हे संकट दूर करण्यासाठी गुंतले गेले आहेत .
या परिस्थितीचा गैरफायदा जंगलतोड करणाऱ्या व्यक्ती घेत असून यामुळे वन्यजीवांचे रक्षण आणि पर्यावरण रक्षण हा मुद्दा गंभीर झाला असल्याचे त्यांनी कर्नाटक सरकारला दिलेल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
मागील काही वर्षात जंगल भागात अतिक्रमण करण्याचे प्रमाण वाढले आहे. लॉकडाऊनच्या काळात मागील दीड ते दोन वर्षात पाचशे चाळीस एकर वनजमीन धोक्यात आले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याकडे आता सरकारने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.