मंगळवारी बेळगाव शहरात पोलिसांनी विनाकारण फिरणाऱ्या व्यक्तींची वीस वाहने जप्त केली आहेत.
विना मास्क फिरणाऱ्या 290 व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.याशिवाय शिवाजीनगर येथील सुरू असलेल्या हॉटेलवर कारवाई करण्यात आली आहे.
के बी रोडवरील बेकरी वर गुन्हा दाखल पोलिसांनी केला आहे.रविवार पेठेत उघडण्यात आलेल्या एका इलेक्ट्रिक दुकानावर कारवाई करण्यात आली आहे.
देशपांडे गल्लीत सुरू असलेल्या बेकरीवर देखील पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यंदे खु ट येथील सुरू असलेल्या मोबाईल दुकानावर पोलिसांनी कारवाई केली आहे.
बेळगाव जिल्ह्यात मंगळवारी कोरोना ने चोवीस बळी घेतले असून नव्या 1260 रुग्णांची नोंद झाली आहे.844 रुग्ण गेल्या चोवीस तासात कोरोना मुक्त झाले आहेत.जिल्ह्यातील एकूण ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 17833 झाली आहे.एकूण मृतांची संख्या 483 झाली आहे.अथणी तालुक्यात 186,बेळगाव तालुक्यात 328,बैल होंगल तालुक्यात 91,चिकोडी तालुक्यात 119,गो काक तालुक्यात 136,हुक्केरी तालुक्यात 69,खानापूर तालुक्यात 73,राम दुर्ग तालुक्यात 86,राय बाग तालुक्यात 37, सौंदत्ती तालुक्यात 123 आणि अन्य 12 अशी गेल्या चोवीस तासात कोरोना रुग्णाची नोंद झाली आहे.