कोरोना काळात देखील लोकांना फसवणुकीच्या घटना देशभरात उघडकीस येत असताना बेळगावात देखील अशीच फसवणुकीची घटना समोर आली आहे. एका कथित आर्मीमॅनने एका लॅब चालकाला फसवणुक करून दहा हजार रुपयचा चुना लावला आहे.
आझाद नगर येथील मुजमिल खताल अहमद कलईगार असे फसवणुक झालेल्याचे नाव असुन तो अल्फा क्लिनिक लॅब नावाने रक्त मुत्र आदी चाचण्यांची आझाद नगर येथे एक लॅब चालवत होता. आर्मीतील जवान या ठिकाणी बऱ्याच वर्षांपासून टेस्ट करेन घेण्यासाठी येत असतात.
या घटनेबाबत समजलेल्या अधिक माहिती नुसार प्रमिल कुमार नामक एका व्यक्तीने कलईगार यांना फोन करून आपल्या ओळखीच्या 25 जवानांचे रक्ताचे नमूने घेऊन जाण्यासाठी सांगितले व प्रत्येकी एक हजार रुपये प्रमाणे देण्याचे ठरविले. व पैसे गुगल पे फोन पे ने देणार आहे. तरी आपला नंबर द्यावा असे सांगितले व पहील्यांदा 5 रू पाठवुन देऊन नंबरची खात्री करून घेतली. व लकरच 10 हजार रुपये जमा करू असे सांगितले व पैसे जमा होतात की नाही ते पहा असे सांगितले.
पण कांही वेळा नंतर कलईगार यांच्याच खात्यातील 10 हजार रुपये दुसऱ्या खात्यात जमा झाल्याचा मॅसेज कलईगार यांना फोनवर आला. त्यावर कलईगार यांना आपली फसवणुक झालेल्याचे कळाले.
या संदर्भात पत्रकारांशी बोलताना मुजम्मिल कलईगार यांनी संपूर्ण घटनाक्रम कथित केला.आपण फसलो गेल्याचे समजताच त्यांनी कथित आर्मीमॅनच्या विरोधात मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला. सदर आर्मीमॅनने शहरातील आणखीन कांही लॅब चालकांना ठकविण्यासाठी संपर्क साधला असल्याची माहिती समोर आली.
त्यामुळे बेळगाव शहरातील लॅब चालकांनी सावध होऊन अश्या कोणत्याही अनोळखी व्यक्तीशी संपर्क साधू नये असे अहवान कलईगार यांनी केले आहे. तसेच या पाठिमागे कोणती टोळी सक्रिय आहे का याची कसुन चौकशी करून न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली आहे.