कोविड रुग्णांची देखभाल करताना कर्नाटक राज्याला ऑक्सिजन तुटवडा मोठ्या प्रमाणात भासत आहे ,या पार्श्वभूमीवर कर्नाटकात स्थानिक पातळीवर तयार होणारा ऑक्सिजन रूग्णांसाठी वापरण्याची परवानगी मिळावी अशी मागणी कर्नाटकचे उद्योगमंत्री जगदीश शेट्टर यांनी केंद्राकडे केली आहे.
सध्या केंद्राकडून या परवानगीची गरज आहे .कर्नाटकात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन निर्माण केला जातो .निर्माण केलेला ऑक्सिजन रुग्णांसाठी वापरण्याची संधी मिळावी अशी मागणी त्यांनी केली आहे. जगदीश शेट्टर यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून यापूर्वी काम केले असून सध्या ते उद्योग मंत्री म्हणून काम करत आहेत .कर्नाटक राज्याची एक उच्चस्तरीय बैठक झाल्यानंतर त्यांनी ऑक्सिजन पुरवठा या विषयावर पत्रकारांशी संवाद साधला.
केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि प्रल्हाद जोशी यांच्याशी आपले बोलणे झाले आहे .केंद्राकडून आल्यानंतरच ऑक्सिजन पुरवठा करणे अवघड जात आहे. यासाठी राज्याने ऑक्सिजन चे उत्पादन वाढले आहे त्यासंदर्भात जिंदाल कंपनीशी सरकारने बोलणे केले असून त्यांनी ऑक्सिजन तयार करण्यास सुरुवात केली आहे.
सध्या राज्याकडे 170 ऑक्सीजन वाहू टँकर आहेत ,68 राज्यभरात पुरवठा करू शकतात .या टँकरचा लाभ घेऊन राज्यभरातील इस्पितळे आणि ज्या ज्या ठिकाणी गरज पडेल अशा ठिकाणी ऑक्सिजन पुरवण्यात येईल त्यासाठी केंद्राच्या परवानगीची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कर्नाटक सरकारने नियंत्रण समितीच्या माध्यमातून विविध प्रयत्न चालवले आहेत .या माध्यमातून उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली असून ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी केंद्राच्या परवानगीची अपेक्षा आहे.