कर्नाटकात लोक अद्यापही सावध होत नाही आहेत. शेजारच्या महाराष्ट्रात परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र राज्यात ती काबूत नाही. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे असं मत आरोग्य मंत्री डी सुधाकर यांनी दिली.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी होऊ देत यासाठी राज्यात १२ मे पर्यंत जनता कर्फ्यू जारी करण्यात आला आहे. तोपर्यंत परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झाली नाही तर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून पुन्हा संपूर्ण लॉकडाऊन जारी करण्यात येईल असे सूतोवाच्य त्यानी केले.
सुधाकर म्हणाले की त्यामुळे १२ मे रोजी जनता कर्फ्यू संपेपर्यंत साथ काबूत न आल्यास कर्फ्यू वाढविण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय जाहीर करण्यात येईल.
राज्यात गेल्या २४ तासांत उपचारांचा उपयोग न होता ३४६ बाधितांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाळींची संख्या १६,८८४वर पोहोचली आहे. त्यामुळे लॉकडाऊन अनिवार्य असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
१५ मे नंतर राज्याला कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध होणार आहे. त्यानंतर १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींचे सार्वत्रिक लसीकरण करण्यास प्रारंभ होईल असे डॉ. सुधाकर यांनी सांगितले.एकंदर लोकांनी तातडीने सावध होण्याची गरज आहे. अन्यथा १२ मे नंतर कर्नाटकात लॉकडाऊन पुन्हा वाढविण्यात येण्याची चिन्हे असल्याचे आरोग्यमंत्री डॉ. सुधाकर यांनी सांगितले.