पिरनवाडी गावामध्ये कोरोनाचाप्रसार मोठ्याप्रमाणात होत असल्याकारणाने ग्रामस्थांच्यावतीने पिरणवाडी गावात संपूर्ण निर्बंध (Lakdown) करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.रविवारी झालेल्या बैठकीत ग्रामस्थांनी हा निर्णय घेत कडक निर्बंध घातले आहेत ते खालील प्रमाणे
१) ग्रामस्थांच्यावतीने बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार दिनांक : 02/06/2021 पासून 04/06/2021 पर्यन्त सरकारी निर्देशानुसार शनिवार आणि रविवार निर्बंध (Full Lockdown) असणार आहे. गावात ५ दिवसासाठीकडक निर्बंध घातलेले आहेत
२) संपुर्ण भाजी-फळ विक्रते, किराणा विक्रते, कारखानदारी, गवंडी, शेंटरींग कामगार हे नियम सर्वाना लागू असणार आहेत.
३) गांवाच्या हद्दीत अनावश्यक फिरणे, पार्टी, कोणतेही सामूहिक खेळ (गोट्या, क्रिकेट, कब्बडी , इतर ) बंधन आहेत.
४) गावातील नागरिकांना रोगाबद्दल कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळ्यास आशा वर्करना संपर्क करावा, सरकारी इस्पितळात किव्हा खाजगी इस्पितळात चाचणी (Test) करून लवकरात लवकर उपचार घ्यावेत.
५) आयुष्यमान भारत योजने आंतर्गत रुग्णावर मोफत उपचार करण्यात येत आहेत.
६) गावातील सर्व समाजातील प्रार्थना स्थळे बंद ठेऊन सहकार्य करावे.
हा रोग नियंत्रण आणण्यासाठी गावातील सर्व नागरिकांनी सहकार्य करावे.
वरील कोणतेही नियम मोडल्यास सरकारी निर्देशानुसार कारवाई करण्यात येईल. यास गावातील पंच मंडळी जबाबदार असणार नाहीत. असेही कळवण्यात आले आहे.