इटगी तालुका खानापूर येथे घराची भिंत कोसळून आजी व नातू ठार व सून जखमी झाल्याची घटना घडली आहे.
रविवारी सकाळपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह सुरू असलेल्या पावसामुळे खानापूर तालुक्यातील इटगी येथे राहत्या घराची भिंत कोसळून दोन ठार दोन जखमी झाल्याची घटना रविवारी सकाळी नऊच्या सुमारास घडली आहे या दुर्घटनेत आजी व तीन वर्षांचा नातू जागीच ठार झाला.
ठार झालेल्या आजीचे नाव दोडडव्वा रुद्राप्पा पटेद वय 55 व त्यांचा नातू अभिषेक सुरेश पटेद वय 3 हे दोघे जागीच ठार झाले तर या घटनेत त्यांचा मुलगा सुरेश व सुन मंजुळा हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल करण्यात आले आहे.
याबाबत समजलेली अधिक अशी की शनिवारी रात्रीपासून सुसाट वारा सुरू आहे वादळी हवामान आहे पीडित कुटुंब आपल्या जुन्या घरात राहत होते सकाळी नऊच्या सुमारास सदर घराची भिंत अचानक पणे कोसळली मयत व्यक्ती त्याखाली सापडल्याने हा अपघात घडला. सदर घटनेची नोंद नंदगड पोलीस स्थानकात झाली असून पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आहे .
सदर दुर्घटनेची बातमी मिळताच नंदगड पोलीस व प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना घटनास्थळी धाव घेत त्या कुटुंबाला धीर दिला.आमदार डॉ अंजली निंबाळकर यांनी सदर कुटुंबाला मदतनिधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले या दुर्घटनेत मयत झालेल्या कुटुंबाला जिल्हाधिकाऱ्यांनी पाच लाखाचे नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.