Wednesday, December 25, 2024

/

होम हवनाने कोरोना कमी झाला तर डॉक्टर कशाला हवेत?- सतीश जारकीहोळी

 belgaum

कर्नाटक प्रदेश काँग्रेस तर्फे जनतेच्या मदतीसाठी कोरोना हेल्पलाईन सुरू करण्यात आली असून त्याचे उदघाटन के पी सी सी कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते काँग्रेस भवनात करण्यात आले.

होम हवन केल्यामुळे कोरोना नष्ट होत नाही.होम हवन करण्यामुळे जार कोरोना गेला असता तर डॉक्टरांची कशाला आवश्यकता भासली असती?होम हवन करण्याने कोरोना नष्ट होतो हे आमदार अभय पाटील यांनी सिध्द करून दाखवले तर आम्ही त्यांचा सत्कार करू असा टोलाही आमदार सतीश जारकीहोळी यांनी लगावला.

होम हवन करण्याने कोरोना नष्ट होत असेल तर पाच वर्षे शिकून डॉकटर कशाला व्हायला पाहिजे अशी टीकाही त्यांनी केली.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी.के.शिवकुमार यांच्या आदेशानुसार राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदार संघात जनतेला अडचणीच्या काळात मदत करण्यासाठी हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे.

कोरोना किट वितरण करण्या बरोबर रेशन किट आणि अन्य साहित्य देखील जनतेला वितरित करण्यात येणार असल्याचे देखील सतीश जारकीहोळी आपल्या भाषणात सांगितले.यावेळी माजी आमदार अशोक पट्टण,आमदार लक्ष्मी हेब्बाळकर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.