सर्वत्र क्लोजडावून आणि कमी वर्दळ याचा उपयोग करून घेऊन सध्या शहरातील विकासकामे जोरदार सुरू आहेत. रस्ते निर्मिती आणि डिव्हायडरची रंगरंगोटी अशी कामे करण्यात येत असून शिल्लक पडलेला भार कमी करण्याचा प्रयत्न प्रशासनाने सुरू केला आहे.
मागच्या वर्षी झालेल्या लॉक डाऊन मध्ये अनेक कामे शिल्लक पडली होती. कामगार कामे सोडून निघून गेले होते. याचा फटका बसल्याने सर्व कामे अर्धवट राहिली होती. पण यावेळी ही कामे पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे.
वर्दळ कमी असल्याने लवकरात लवकर कामे करून संपवा अशी मागणी करण्यात आली आहे. ही मागणी लक्षात घेऊन प्रशासन कामे करीत असल्याचे चित्र आहे. पाऊस तोंडावर आला आहे.
सध्या रोजच वळीव कोसळत आहे. या पार्श्वभूमीवर कोणतीही कामे शिल्लक राहिल्यास येत्या पावसात नागरिकांना अधिक त्रासाचा सामना करावा लागणार असून
याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे.
तसेच ही कामे सुरू असताना कामगार वर्गाला मास्क, सॅनिटायझर अशा सोयी पुरविण्याचीही गरज असून त्याकडे प्रशासनाचा कानाडोळा झाल्याचे दिसून येत आहे.