कोरोना संक्रमण रोखण्यासाठी बेळगाव जिल्ह्यात करण्यात येत असलेल्या उपाय योजनेचा आढावा घेण्यासाठी आणि जिल्हा रुग्णालया बाबत अनेक लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेण्यासाठी मुख्यमंत्री बी.एस.येडीयूरप्पा शुक्रवारी बेळगावला येत आहेत.
विशेष विमानाने येडीयूरप्पा यांचे बेळगावला आगमन होणार आहे.बेळगावला आल्या नंतर थेट ते सुवर्ण सौढ येथे जाणार असून अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेणार आहेत.
या बैठकीला लोकप्रतिनिधी आणि मंत्रीही उपस्थित राहणारा आहेत.जिल्हा रुग्णालयातील अनागोंदी कारभाराबाबत सर्वसामान्य नागरिका पासून मंत्र्या पर्यंत सगळ्यांनी खुद्द मुख्यमंत्र्याकडे नाराजी व्यक्त केली.
आमदार आणि मंत्री यांची नाराजी मुख्यमंत्र्यांना दोन दिवसापूर्वी झालेल्या व्हिडिओ कॉन फरांसिंग वेळी दिसून आली.अनेक आमदारांनी तर थेट आरोप केले.
या तक्रारींची गंभीर दखल मुख्यमंत्र्यांनी घेवून आपण स्वतः बेळगावला भेट देवून जिल्हा रुग्णालयातील समस्यांचे निराकरण करणार असल्याचे सांगितले होते.त्या नुसार मुख्यमंत्री शुक्रवारी बेळगावला येत आहेत.