Tuesday, February 4, 2025

/

गरीब गरजूंना इंदिरा कॅन्टीनमध्ये मिळणार मोफत जेवण व नाश्ता!

 belgaum

लॉकडाउनच्या कालावधीमध्ये राज्यातील स्थलांतरित कामगारांसह आर्थिक दुर्बल आणि कुली कामगारांच्या पोटाचे हाल होऊ नयेत यासाठी इंदिरा कॅन्टीनमध्ये त्यांच्या मोफत नाश्ता व दोन वेळेच्या जेवणाची व्यवस्था करण्याचा आदेश नगर विकास मंत्रालयाने दिला आहे.

कोरोना प्रादुर्भावाला आटोक्यात आणण्यासाठी गेल्या सोमवारपासून राज्यभरात जारी करण्यात आलेला लाॅक डाऊन येत्या 24 मेपर्यंत राहणार आहे. या कालावधीत समाजातील रोजंदारी कामगार स्थलांतरित मजूर आणि आर्थिक दुर्बल वर्गातील घटकांना जेवण मिळण्यास समस्या येऊ शकते. याची गांभीर्याने दखल घेऊन इंदिरा कॅन्टीनमध्ये मोफत जेवण व नाश्ता देण्याचा हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यात कोरोनाचा वाढलेला प्रादुर्भाव नियंत्रणाखाली आणण्यासाठी लाॅक डाऊन जाहीर करण्यात आला आहे. याशिवाय विविध निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तेंव्हा याची झळ स्थलांतरित मजूर गोरगरीब व आर्थिक दुर्बल घटकांना बसण्याची शक्यता गृहीत धरून या सर्वांसाठी आता इंदिरा कॅन्टीनमध्ये सकाळी नाश्ता तसेच दुपारी व रात्री जेवण मोफत दिले जाणार आहे. सदर उपक्रम राबविताना गरजूंना लाभ देण्यासह जेवण्यासाठी येणाऱ्यांची नोंद ठेवावी, असे कॅन्टीन चालकांना सांगण्यात आले आहे.

दरम्यान, सरकारने या पद्धतीने मोफत नाश्ता व जेवण देण्याचे जाहीर केले असले तरी या योजनेबाबत लाभार्थी अनभिज्ञ आहेत. यात भर म्हणून सध्या लाॅक डाऊनमुळे बाहेर पडण्यास मज्जाव आहे. यादरम्यान लाभार्थी इंदिरा कॅन्टीनकडे कसे जाणार? जेवणानिमित्त जात असताना पोलिसांचे सहकार्य मिळेल का? आदी प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.