Sunday, January 5, 2025

/

शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे; निदर्शने

 belgaum

लॉक डाऊनमुळे भाजीपाल्यासह कृषी उत्पादनाच्याक दरात झालेली घसरण आणि खतांच्या किंमतीत झालेली जबर वाढ याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी आज जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सांकेतिक धरणे धरून निदर्शने केली. तसेच शेतकऱ्यांच्या अडचणी सरकारने तातडीने सोडवाव्यात, अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला सादर केले.

नेगीलयोगी रयत संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आज सोमवारी सकाळी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरून निदर्शने केली. लॉकडाउनमुळे शेतकऱ्यांना भाजीपाल्यासह अन्य कृषी उत्पादने बेळगावात आणून विक्री करणे कठीण होत आहे. बेळगावला आणेपर्यंत भाजीपाला व कृषी उत्पादने खराब होऊन शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी लॉकडाउनमुळे बाजार बंद आहेत.

याचाही फटका शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे सरकारने लागलीच सर्वेक्षण करून पीक नुकसानीचा आढावा घ्यावा. याव्यतिरिक्त दिवसेंदिवस खतांच्या किंमतीही आवाक्याबाहेर जात आहेत. त्या कमी कराव्यात या मागणीसाठी नेगीलयोगी रयत संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आज हे आंदोलन छेडले.

यावेळी बोलताना नेगीलयोगी रयत संघटनेचे अध्यक्ष रवी पाटील म्हणाले, लॉक डाऊनमुळे भाजीपाल्याचे दर गडगडले आहेत. ६० किलो भाजीला अवघा १०० तर १५० रुपये दर मिळत आहे. पुढचे पीक घ्यायचे झाल्यास खतांच्या दरवाढीमुळे कंबरडे मोडायची वेळ आली आहे. खताच्या पोत्यात ४०० रुपयांवरून ७०० रुपये इतकी जबर वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे जगणे कठीण झाले आहे. याची गांभीर्याने दखल घेऊन महसूल मंत्री अशोक यांनी कृषी मंत्र्यांशी चर्चा करून पीक सर्वेक्षण करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी पावले उचलावीत.

कृषी मंत्र्यांनीही खतांच्या किमती कमी करण्यासाठी पुढाकार घ्यावा. मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनीही शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी तातडीने पावले उचलावीत अशी मागणी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी केली.

या समस्या न सोडविल्यास लॉक डाऊन संपताच सर्व तालुका केंद्रांवर धरणे आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.
एकंदरीत संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीला सरकारने धावून यावे अशी मागणी करत शेतकऱ्यांनी सांकेतिक स्वरूपात धरणे धरून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला निवेदन सादर केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.