कोरोना प्रादुर्भाव वाढत असताना बनावट ओळखपत्र करून देणारे एक रॅकेट पोलिसांनी उघडकीस आणले आहे.पोलीस उपायुक्त विक्रम आमटे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी धाड टाकून ही कारवाई केली आहे.
बनावट ओळखपत्र करून देणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.खडेबाजार पोलिसांनी कडोलकर गल्लीतील एका प्रिंटिंग युनिट वर धाड घालून बनावट ओळखपत्र तयार करून देणारे रॅकेट उघडकीस आणले आहे.
धाडीत पोलिसांनी बनावट ओळखपत्र तयार करण्यासाठी वापरण्यात आलेले कॉम्प्युटर,प्रिंटर आणि अन्य साहित्य जप्त केले आहे.
कारखाने,वित्तीय संस्था,सहकारी सोसायट्या आणि केटरिंग यांच्या नावाने बनावट ओळखपत्रे तयार करून देण्यात येत होती.
या प्रकरणी कडोलकर गल्ली भातकांडे गल्ली येथील दोघा युवकांना पोलिसांनी अटक केली आहे.डी सी पी डॉ.विक्रम आमटे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.