कर्नाटक राज्यात शेतकऱ्यांच्या समस्या घेऊन नेहमी अग्रभागी असणारे शेतकरी नेते,माजी केंद्रीय मंत्री बाबागौडा पाटील यांचे निधन झाले आहे.
गेल्या आठवडा भरा पासून आजारी असल्याने बेळगावातील के एल ई इस्पितळात त्यांच्यावर उपचार सुरू होते शुक्रवारी सकाळी त्यांचे उपचार सुरू असताना निधन झाले.
बेळगाव जिल्ह्यातील हिरेबागेवाडी जवळील चिक्कबागेवाडी गावचे रहिवाशी असलेले बाबागौडा पाटील यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात ग्रामीण विकास राज्य मंत्री पद भूषवले होते.शेवट पर्यंत ते शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करत होते.
बाबागौडा यांच्या निधनामुळे राज्यातील शेतकऱ्यांचा कैवारी नेता हरपला आहे.