उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांचे बंधू आणि कृष्णा साखर कारखान्याचे अध्यक्ष परप्पा सवदी यांचे चिरंजीव विनोद सवदी (वय 36) यांचे आज बुधवारी कोरोनामुळे निधन झाले.
कोरोनाची लागण झाल्यामुळे गेल्या कांही दिवसांपासून बेळगावमधील हॉस्पिटलमध्ये विनोद सवदी यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र दुर्दैवाने उपचाराचा फायदा न होता आज बुधवारी त्यांचे निधन झाले.
विनोद सवदी हे एक धडाडीचे व्यक्तिमत्त्व होते. मागील लाॅक डाऊनच्या काळामध्ये गोरगरीब आणि असहाय्य लोकांच्या मदतीला धावून जाताना त्यांनी जीवनावश्यक साहित्याचे वाटप, भोजन वाटप आदी उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविले होते.
याव्यतिरिक्त इतरही सामाजिक उपक्रम ते सातत्याने राबवत असत. त्यांच्या या कार्यपद्धतीमुळे त्यांच्याकडे भावी नेते म्हणून पाहिले जात असतानाच आता अवघ्या 36 व्या वर्षी त्यांचे अकाली निधन झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.