कोरोना रुग्णावर उपचार करण्यासाठी आवश्यक ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हर यांचा सुरळीत पुरवठा केला जावा.त्या बरोबर सरकारच्या कोरोना नियमावलीचे काटेकोरपणे पालन करावे.नियमांचा भंग करणाऱ्यावर कठोर कारवाई करा असा आदेश बेळगावचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री गोविंद कार्जोळ यांनी बैठकीत अधिकाऱ्यांना दिला.
बेळगावच्या शासकीय विश्रामगृहात कोरोना नियंत्रण आणि उपचार करण्याबाबत उच्च स्तरीय बैठक पार पडली.
मर्गासूचीच पालन करण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर क रा.ऑक्सिजन पुरवठा नियमित करावा.खासगी आणि सरकारी इस्पितळात ऑक्सिजनची टंचाई जाणवणार नाही याची खबरदारी घ्या.आरोग्य खात्याच्या कर्मचाऱ्यांनी चोवीस तास सेवा बजावावी.डॉक्टरांनी स्वतः कोरोना वार्ड ला भेट नियमित देवून पाहणी करावी अशा सूचना गोविंद कार्जोळ यांनी बैठकीत अधिकाऱ्यांना केली.
गो काक , सौंदत्ती आणि बेळगाव तालुक्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत आहे.त्यामुळे कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक ती उपाय योजना करा.जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची तपासणी करण्यासाठी प्रयोगशाळा सुरू करायच्या असल्यास त्याचा त्वरित प्रस्ताव द्यावा म्हणजे सरकारकडून त्याला मंजुरी मिळवून देता येईल . पहिली लस घेतलेल्या व्यक्तींना प्राधान्याने दुसरी लस द्यावी .या बाबत आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी त्वरित उपाय योजना करावी.
जिल्हा रुग्णालयात आणखी एक ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सुरू करण्याबाबत मुख्य सचिवांना विनंती करण्यात आली असून त्या बाबतचा प्रस्ताव त्वरित द्यावा.रुग्णांना त्वरित उपचार मिळण्यासाठी आणि बेड उपलब्ध करून देण्यासाठी वार रुममध्ये त्वरित उपाय योजना करावी असेही गोविंद कार्जोळ यांनी अधिकाऱ्यांना बैठकीत सांगितले.बैठकीला अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती, आम भालचंद्र जारकीहोळी, जिल्हाधिकारी हरीश कुमार आदी उपस्थित होते.