‘खाकी वर्दीतील माणुसकी’-कोविड काळात इस्पितळात उपचार घेणाऱ्या रुग्णाला एक हेड कॉन्स्टेबलने रक्तदान करत माणुसकी दाखवली आहे.
के एल ई हॉस्पिटलमधे उपचार घेणाऱ्या रुग्णाला त्वरित रक्ताची आवश्यकता होती.ही माहिती फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे संतोष दरेकर यांना समजताच त्यांनी केवळ अर्धा तासात रक्ताची व्यवस्था केली.
विशेष म्हणजे रक्तदान करणारे हे पोलीस कर्मचारी होते.पोलीस आयुक्त कार्यालयात हवालदार म्हणून सेवा बजावणारे सुनीलकुमार शिवप्पा बागलकोटी यांनी लगेच के एल ई हॉस्पिटलमधे येवून रुग्णासाठी रक्त देवून आपली सामाजिक बांधिलकी जपली.
बागलकोटी यांनी केलेल्या रक्तदानाची दखल पोलीस उपायुक्त डॉ विक्रम आमटे यांनी घेतली असून त्याविषयी ट्विट केले आहे.
ओ पॉ जी टी व्ह गटाचे रक्त तानाजी पाटील या रुग्णाला आवश्यक होते.फेसबुक फ्रेंड्स सर्कलच्या प्रयत्नाने रुग्णाला वेळेत रक्त मिळाले.