संपुर्ण लॉक डाऊन हाच उत्तम पर्याय आहे. ऑक्सिजन आणि लस पुरवठा करताना केंद्र सरकार राज्याशी जो भेदभाव करतं आहे तो योग्य नाही केंद्र सरकार राज्यांशी भेदभाव करत असल्याची टीका सतीश जारकीहोळी यांनी केली.
गोकाक मधील हिल गार्डन कार्यालयात. माध्यमांशी ते बोलत होते. राज्यात ऑक्सिजनचा अभाव भासत आहे. दवाखान्यात पुरेल इतका ऑक्सिजन साठा नाही आहे.
डॉक्टरांना रुग्णांना उपचार देण्यात अनेक समस्या जाणवत आहेत. दवाखान्यात फक्त 50% ऑक्सिजन आहे. जास्त ऑक्सिजन पुरवण्यासाठी अधिकाऱ्यांशी चर्चा करून उपलब्ध करा अशी मागणी त्यांनी केली.
राज्यातील समस्येबाबत खासदारांनी केंद्रात आवाज उठवला पाहिजे. कर्नाटकात कोरोना रोगाने अक्षरशा थैमान घातले आहे. अनेक लोक संकटात सापडले आहेत.
अशा लोकांना येथील आमदारांनी संकटातून बाहेर काढणे आवश्यक आहे. पण यांनी थोड देखील कार्य करतं नाही आहेत. ते आमदार फक्त नावापुरतेच राहिलेत असे सतीश जारकिहोळी यांनी सांगीतले.