कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या आणि मृत्यूमुळे सध्या जवळपास आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. यात भर म्हणून सध्या सिव्हील हॉस्पिटलचा कॅज्युलीटी फोन बंद असल्यामुळे चौकशी करताना त्रास होत असल्याने नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
सध्याच्या कोरोनाग्रस्त परिस्थितीत सिव्हिल हॉस्पिटलची भूमिका महत्वाची असताना सध्या या हॉस्पिटलमधील दुर्घटना दूरध्वनी क्रमांक अर्थात कॅज्युलीटी फोन नंबर बंद पडला आहे. त्यामुळे नागरिकांना तातडीची वैद्यकीय सेवा अथवा त्यासंबंधीची आवश्यक माहिती मिळणे बंद झाले आहे.
सदर दूरध्वनी क्रमांक अहोरात्र 24 तास सुरू राहणे अत्यावश्यक असताना सध्या तो बंद असल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने जवळपास आपत्कालीन परिस्थिती निर्माण केली आहे.
या परिस्थितीमुळे आधीच जनतेत भीतीचे वातावरण पसरलेले आहे. यात भर म्हणून सिव्हील हॉस्पिटलचा कॅज्युलीटी फोन बंद असल्यामुळे सखेद आश्चर्य आणि आणि तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.