खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना ऑक्सिजन नसल्यामुळे समस्या उदाभवली होती.त्यावेळी बिम्सच्या डॉकटर त्यांच्या मदतीला धावून गेले आणि त्यांना बिम्स मध्ये दाखल करून त्यांचे प्राण वाचवले.
बेळगाव शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन तुटवडा होता.तेथे एकवीस रुग्ण आय सी यू मध्ये उपचार घेत होते.परिस्थिती बिकट झाली होती.तेव्हा खासगी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी बिम्सच्या डॉक्टरांशी संपर्क साधला.सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली.
बिम्सचे डॉकटर लगेच त्यांच्या मदतीला धावून गेले आणि त्यांनी एकवीस रुग्णांना बिम्समध्ये दाखल केले.त्यांच्यावर उपचार करून आणि ऑक्सिजन देवून त्यांचे प्राण वाचवले.डॉक्टरांनी लगेच त्यांना बिम्समध्ये दाखल करून उपचार केल्याने त्यांचे प्राण वाचले.
खासगी दवाखान्यातील आणि सरकारी हॉस्पिटल मधील डॉकटर कोरोनाशी सर्व शक्तीने लढा देत आहेत.त्यामुळेच एकवीस रुग्णांचे प्राण वाचले.डॉक्टरांनी एकमेकांना सहकार्य केल्यामुळे रुग्णांचे प्राण वाचले असे बिम्सचे संचालक डॉ.विनय दस्तिकोप यांनी सांगितले.
बिम्समध्ये तीनशे बेडचा एक ब्लॉक असून तेथे कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत.आज दुपार पर्यंत तेथे २८७ रुग्ण उपचार घेत होते.जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेवून आणखी एक ब्लॉक कोरोना रुग्णासाठी सुरू करण्यात येणार आहे अशी माहितीही डॉ.विनय दास्तीकोप यांनी दिली.