भुतरामनहट्टी येथील कित्तूर् राणी चन्नमा प्राणी संग्रहालय कोरोना संक्रमणामुळे अडचणीत आले आहे.कोरोना लॉक डाऊन मुळे लोक प्राणिसंग्रहालय बघायला जावू शकत नाहीत.त्यामुळे त्याचा थेट परिणाम प्राणी संग्रहालयावर झाला आहे.
केवळ चाळीस रुपये तिकीट असून अधिक लोकांनी भेट दिली तर अधिक उत्पन्न मिळते.पण आता लोकच येत नसल्याने प्राणी संग्रहालयाला आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागत आहे.यासाठी जनतेने पुढे येवून प्राणी संग्रहालयातील प्राणी दत्तक घ्यावेत असे आवाहन प्राणी संग्रहालयाच्या पशू वैद्यकीय अधिकारी निरुपमा जयसिंग यांनी केले आहे.
उत्पन्न सध्या नसल्याने बंनेरघट्टा आणि म्हैसूर प्राणिसंग्रहालया च्या मदतीवर अवलंबून राहावे लागत आहे.जनतेने प्राणी दत्तक घ्यावेत किंवा देणगी द्यावी.
प्राणी संग्रहालया चे फेसबुक पेज असून ते पाहून लाईक करवे म्हणजे अधिक प्रसिध्दी मिळेल.प्रसिध्दी मिळाली की लोक देणगी देण्यास पुढे येतील.
पुढच्या पिढीला प्राणी दाखवायचे असतील तर ते प्राणी जतन केले पाहिजेत.अन्यथा तुमच्या मुलांना,नातवंडांना प्राणी बघायला मिळणार नाहीत असेही पशू वैद्यकीय अधिकारी निरुपमा जयसिंग यांनी सांगितले.
प्राणी संग्रहालय फेसबुक पेज आहे असे
https://www.facebook.com/belagavizoo.krcmz