हॉस्पिटलना त्वरित ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी बेळगावात मोबाईल सिलिंडर बँक ही संकल्पना राबवण्यात आली आहे.खासगी हॉस्पिटलना त्वरित ऑक्सिजन मिळावा हा मोबाईल सिलिंडर बँकेचा उद्देश आहे.
यामुळे कोरोना रुग्णावर उपचार करण्यासाठी ऑक्सिजन लगेच उपलब्ध होणार आहे असे जिल्हाधिकारी एम .जी.हिरेमठ यांनी सांगितले.
मोबाईल सिलिंडर बँक ही कल्पना आय एम ए च्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यावर राबवण्याचा निश्चय करण्यात आला.या योजनेद्वारे जिल्हा प्रशासन खासगी हॉस्पिटलना त्यांच्या मागणीनुसार लगेच ऑक्सिजन सिलिंडर पुरवठा करणारा आहे.
या योजनेद्वारे पन्नास ऑक्सिजन सिलिंडर देण्यात येणार आहेत.त्यामुळे खासगी हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णावर उपचार करताना ऑक्सिजनची टंचाई जाणवणार नाही.
ही संकल्पना यशस्वी झाली तर अधिक ऑक्सिजन सिलिंडर पुरवण्यात येतील असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.