हेस्काॅमच्या बेजबाबदारपणामुळे सध्या ग्रामीण भागातील ग्राहकांना विनाकारण दंड भरून वीज बिल भरावे लागत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे तात्काळ लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.
बेळगाव ग्रामीण भागात पूर्वी 10 तारखेपर्यंत वीज बिले नागरिकांना अर्थात ग्राहकांना दिली जात होती आणि ग्राहक ही बिले विना दंड 18 तारखेपर्यंत भरत होते.
मात्र अलीकडे लाॅक डाऊनमुळे हेस्काॅमकडून वीज बिले उशिरा दिली जात आहेत.
मुळात विजेचे बिल 18 -19 तारखेला मिळत असल्यामुळे ग्राहक त्यानंतर वीज बिले भरत आहेत. मात्र दरम्यानच्या काळात बिल भरण्याची अंतिम तारीख उलटून जात आहे.
त्याचप्रमाणे शंभरच्या पुढे प्रतियुनिट 2 रुपये जादा आकारले जात असल्यामुळे ग्राहकांना विनाकारण आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.