मतमोजणी केंद्रात उपस्थित राहण्यासाठी कोविड निगेटिव्ह टेस्ट प्रमाणपत्र गरजेचे आहे त्याकरिता वार्ता भवनात पत्रकारांची कोविड टेस्ट करण्यात आली होती त्या टेस्ट मध्ये प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे 12 पत्रकार कोरोना बाधित असल्याचे आढळून आले आहे.
कोविड पॉजिटिव्ह आढळलेल्या पत्रकारांना आयसोलेशन मध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे त्यामुळे ते 12 पत्रकार आयसोलेशन मध्ये आहेत.
दरम्यान कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि परिवहनमंत्री लक्ष्मण सवदी यांनी पोजिटिव्ह आढळलेल्या पत्रकारांना प्रथम उपचार मिळाले पाहिजेत अशी सूचना दिली.
पत्रकार हे देखील कोरोना वारीयर्स प्रमाणे वार्तांकन करून जनतेला बातम्या देण्याचे कार्य करत असतात. सवदी यांनी माहिती खात्याचे आयुक्त डॉ अंजुम परवेझ यांना फोन करून सदर पत्रकारांना औषध उपचार करा अश्या सूचना केल्या आहेत.
उद्या रविवारी होणाऱ्या मतमोजणी दरम्यान सर्व कोविड नियमावलीचे पालन करून मतमोजणी होणार आहे.दरम्यान शनिवारी बेळगाव जिल्ह्यात 532 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे