दुकान बंद करण्याची वारंवार सूचना देऊन देखील त्याची दखल न घेता आपले कपड्याचे दुकान उघडे ठेवणाऱ्या तरुणीला ‘उद्यापासून दुकान उघडले असेल तर तुझा पायाच मोडेन, असा इशारा एका एएसआयने दिल्याची घटना आज शहरातील गणपत गल्ली येथे घडली.
राज्यभरात क्लोज डाऊन जारी करण्यासह कोरोना संदर्भातील निर्बंध अधिक कडक करण्याच्या आजच्या सहाव्या दिवशी बेळगावच्या बाजारपेठे प्रचंड गर्दी होती. या गर्दीवर नियंत्रण मिळवण्याचा पोलीस आटोकाट प्रयत्न करीत होते.
राज्यभरात निर्धारित वेळेत फक्त जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्यास सरकारने परवानगी दिली आहे. तथापि शहरातील गणपत गल्ली येथे एका तरुणीने आपले कपड्याचे दुकान सुरू ठेवले होते. दुकान बंद करायला आलेल्या पोलिसांशी त्या तरुणीने वाद घातला. बाकीची दुकाने उघडी आहेत ती आधी बंद करा, असे त्या तरुणीने पोलिसांना सांगितले.
तरुणीच्या या उद्दामपणामुळे संतापलेल्या एएसआयने यूसलेस फेलो, माणूस आहे की जनावर, चार वेळा येऊन दुकान बंद कर म्हणून सांगितले तरीही दुकान उघडे ठेवले. उद्यापासून दुकान सुरू ठेवल्यास तर पायाच मोडेन, असा इशारा दिला. सरकारने कोरोना नियंत्रणासाठी इतकी नियम लागू करून देखील जनता त्याचे पालन करण्यास तयार नाही.
एकंदरीत आजची गर्दी आणि उघडी दुकाने पाहता हे कोरोनाला उघड उघड आमंत्रण असल्याचे दिसून येत आहे. लोकांनी स्वतःसाठी तसे निदान आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी तरी करण्याचे सरकारी नियम पाळणे जरुरीचे आहे, म्हणजे पोलिसांना दांडगाई करावी लागणार नाही अशी प्रतिक्रिया सुज्ञ नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.