कोरोना प्रादुर्भाव आणि सध्याच्या लॉक डाऊनच्या काळामध्ये नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी शहरातील सर्व प्रभागांमध्ये भाजीपाला, फळे आणि फुले विक्रीची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आता बागायत खाते, कृषी उत्पादन विक्री समिती, जिल्हा होपकॉम्स आणि शेतकरी उत्पादक निर्यातदार यांनी संयुक्तरीत्या पुढाकार घेतला आहे.
बेळगाव शहराच्या सर्व प्रभागांमध्ये भाजीपाला, फळे आणि फुलांच्या विक्रीसाठी राबविण्यात येणाऱ्या या योजनेसाठी संबंधित प्रभागांमध्ये नोडल अधिकाऱ्यांकडून भाजी वाहनांची व्यवस्था केली जाणार आहे, असे बागायत खात्याच्या उपसंचालकांनी कळविले आहे.
तेंव्हा नागरिकांनी अधिक माहितीसाठी खाली नमूद केलेल्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
किरणकुमार उपळे, वरिष्ठ सहाय्यक बागायत संचालक बेळगाव. (मो. क्र. 9886909153) प्रभाग क्र. 1 ते 12. लक्ष्मण यड्रावी, सहाय्यक बागायत संचालक बेळगाव. (मो. क्र. 9980065304) प्रभाग क्र. 13 ते 24. बसनगौडा पाटील,
सेक्रेटरी जिल्हा होपकॉम्स बेळगाव. (मो. क्र. 9480343791) प्रभाग क्र. 25 ते 36. इराण्णा बटकुर्की, सहाय्यक बागायत संचालक बेळगाव. (मो. क्र. 9880085009) प्रभाग क्र. 37 ते 48. रवी भजंत्री, एपीएमसी बेळगाव (मो. क्र. 9972616609) प्रभाग क्र. 49 ते 58.