कर्नाटक सरकार राज्यात लॉक डाऊन करण्याच्या तयारीत आहे. असे झाल्यास लग्न व इतर कार्यक्रम करता येणार नाहीत. आधी ठरविलेल्या लग्न व समारंभांना पूर्ण करणे कठीण जाणार आहे.
सध्या सुरू असलेल्या क्लोज डाऊन मध्ये लग्न व इतर समारंभ करण्यास अनुमती मिळत होती. कमीतकमी लोक घेऊन लग्ने करता येत होती. पण आता ही संधी मिळणार नसल्याचेच समोर येत आहे अशी शक्यता व्यक्त होत आहे.
लॉक डाऊनच्या अधिकृत घोषणा नंतरच ते स्पष्ट होणार आहे.लग्नासारख्या कार्यक्रमात गर्दी होऊनच कोरोना जास्त पसरत चालला आहे. यामुळे सरकारला आता कठोर निर्णय घेण्याची शक्यता आहे.
दहा तारखे नंतर कडक लॉक डाऊनची घोषणा व्हायची शक्यता आहे त्या नुसार बेळगावातील अधिकाऱ्यांनी देखील तयारी सुरू केली आहे.दहा तारखे नंतरचे परवानगी दिलेले सर्व विवाह सोहळे रद्द होतील अशी शक्यता अधिकारी व्यक्त करत आहेत.