राज्यात कोरोना ग्रस्तांची संख्या वाढत असल्यामुळे ऑक्सिजनची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याची दखल घेऊन सरकार प्रत्येक जिल्ह्यातील रुग्ण संख्येनुसार ऑक्सिजनचा पुरवठा करणार आहे. त्यानुसार बेळगाव जिल्ह्याला दररोज 27 टन ऑक्सिजनचा पुरवठा केला जाणार आहे.
राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यांच्यासाठी ऑक्सिजनची मागणी देखील वाढली आहे. राज्यात कोरोना रुग्णांना ऑक्सिजन मिळत नसल्याची माहिती पुढे येत असल्याने सरकारने राज्य नोडल अधिकाऱ्यांना ऑक्सिजन पुरवठा याबाबत योग्य त्या उपाययोजना करण्याची सूचना केली आहे.
त्यानुसार सर्व जिल्ह्यांना योग्यप्रकारे ऑक्सिजनचा पुरवठा होण्यासाठी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे ऑक्सिजन वितरणाचे राज्य नोडल अधिकारी मुनीष मोदगील यांनी प्रत्येक जिल्ह्याच्या नोडल अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
ऑक्सिजन पुरवठा बाबत योग्य त्या उपाययोजना करण्याची तसेच ऑक्सिजन पुरवठ्यात कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये याची दखल घेण्याचे जिल्हा नोडल अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे.
सरकार प्रत्येक जिल्ह्यातील रुग्ण संख्येनुसार ऑक्सिजनचा पुरवठा करणार आहे. राज्यात सर्वाधिक ऑक्सिजन पुरवठा बेंगलोर शहराला केला जाणार असून बेळगाव जिल्ह्याला 27 टन ऑक्सिजन पुरवठा होणार आहे.