जिल्ह्यात एक कोरोना वार रूम आणि प्रत्येक तालुक्यात एक कोरोना वार रूम सुरू करण्यात आली आहे.पंधरा के एल ऑक्सिजन पुरवठा पूर्वी जिल्ह्यात होत होता आता जिल्ह्याला बावीस के एल ऑक्सिजन पुरवठा होत आहे.
बेळगावातील तीन प्रकल्पातून देखील ऑक्सिजन पुरवठा होत आहे अशी माहिती जिल्हाधिकारी एम.जी.हिरेमठ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
घरीच आयसोलेशन मध्ये असणाऱ्या रुग्णांना फोनवरून मार्गदर्शन आणि समुपदेशन केले जात आहे.दररोज आरोग्य खात्यातर्फे त्यांच्या तब्येतीची चौकशी केली जात आहे.हॉस्पिटल मधील उपलब्ध बेड ची माहिती जनतेला दिली जात आहे.
प्रत्येक तालुक्यातील कोरोना केअर सेंटर मध्ये रुग्णावर उपचार केले जात आहेत अशी माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.